पातूर : पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीना मारहाण व गटविकास अधिकाऱ्यांचे कक्ष तोडफोड केल्याचा आरोप असलेल्या आरोपींना आज न्यायालयाने निर्दोष करार दिला आहे.
पातूर पंचायत समिती येथे सन 2015 ला गटविकास अधिकारी म्हणून एम.बी.मुरकुटे नियुक्त होते. त्यांच्या दालनात असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हटविल्यामुळे भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते व गटविकास अधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची होऊन वाद पेटला होता.त्या नंतर गटविकास मुरकुटे यांनी पातूर पोलिसांत जीवन उपर्वट, बंडू पाटील, नाना अंभोरे,राजू बोरकर,दिनेश गवई,स्वप्निल सुरवाडे, मनोज गवई,निशांत गवई यांच्या विरुध्द कलम 353,332,448,143,147,427,504,506, महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा 3,4 अन्वये गुन्हा दाखल केला होता.सदर प्रकरणी दि.29 नोव्हेंबर 2023 रोजी न्यायाधीश सुनील पाटील साहेब यांचे अकोला सत्र न्यायालयात आरोपींची सुनावणी झाली असून सदर आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.यावेळी आरोपींच्या वतीने ॲड. दिलदार खान,ॲड.देवानंद गवई,ॲड.राहुल इंगळे,ॲड.आर.एन.वानखडे,ॲड. अन्वर खान तर सरकार पक्षातर्फे ॲड.गोदे साहेब यांनी बाजू सांभाळली.