पातुर शहरांमध्ये गेल्या चार महिन्यापासून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजने करिता गावातील नागरिकांकडून अर्ज प्राप्त करण्याचे आव्हान नगर परिषद कडून केले होते या बाबत नगरपरिषद ला एकूण 649 अर्ज प्राप्त झाले. परंतु नगर परिषद कडून अद्याप पर्यंत या अर्जाची योग्य छाननी न केल्यामुळे डीपीआर पाठवण्यास विलंब होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते त्याकरिता पातुर शहरातील भाजपा पदाधिकारी यांनी आज चर्चासत्राकरिता पातुर नगर परिषद येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये पातुर नगर परिषद चे कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी सय्यद ऐसानुद्दीन, सय्यद अफसर व प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा होऊन त्या घरकुलाचा लवकरात लवकर तोडगा काढण्याची चर्चा करण्यात आली. चार दिवसांमध्ये पातुर शहरातील घरकुल फायली मधील त्रुटी अडचणी दूर करण्याकरिता चर्चा करण्यात आली . उद्यापासून पातुर शहरांमध्ये नगरपरिषद कर्मचारी व प्रधानमंत्री योजना चे प्रतिनिधी संयुक्त गावांमध्ये फिरून त्रुटी असलेल्या लोकांना त्यांची माहिती देणार आहेत. या बैठकीमध्ये मुख्याधिकारी सय्यद ऐसानुद्दीन, प्रशासन अधिकारी अफसर बांधकाम विभागाचे प्रमोद घोडे, माजी नगर उपाध्यक्ष राजू उगले माजी नगरसेवक सचिन ढोणे समाजसेवक गणेश गाडगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते
