देशभक्त ची कबड्डी टीम विभागीय स्तरावर
तांदळी खू. अकोला जिल्ह्यातील 17 वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत देशभक्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मधील चमूने जिल्हास्तरीय स्पर्धेत अंतिम सामन्यात तेल्हारा तालुक्यातील टीम ला पराभुत करून विभागीय स्तरावर प्रवेश निश्चित केला आहे, या टीम मध्ये सार्थक भुंबरे, पार्थक भूंबरे, हरिओम बर्डे, प्रफुल्ल डाबेराव, कार्तिक चीतोडे, पवन डाबेराव, पार्थ थोरात, शिवप्रेम माने, वेदांत धोत्रे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता, विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक पियूष भोपळे, देवदत्त खंडेराव तसेच क्रीडा शिक्षक गवई सर, काळे सर व इतर शिक्षक व प्राचार्या गवई मॅडम यांना दीले आहे. ग्रामीण भागात लहानशा गावातील टीम ने जिल्हा स्तरावर यश मिळवल्याने विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.