अकोला प्रतिनिधी – स्थानिक शिवणी ,शिवर येथील कोरोना काळामध्ये एमआयडीसी मधील कामगार वर्गाला रविवारी ही सुट्टी देण्यात येत होती ती सुट्टी एम.आय.डी.सी. असोशियनने रद्द करून जी पूर्ववत सुट्टी सोमवार होती ती कामगारांना परत देण्यात यावी जेणेकरून सोमवार या दिवशी त्यांच्या पाल्यांचे शासकीय कागदपत्रे तथा त्यांची शासकीय कामे ही होतील त्या अनुषंगाने सोमवार ही पूर्वरत सुट्टी करण्यात यावी व कामगारांना ताशी आठ तासाप्रमाणे पाचशे रुपये प्रति दिवसाप्रमाणे रोजंदारी देण्यात यावी या प्रमुख मागणी संदर्भात कामगार बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी दिनांक ६ फेब्रुवारी रोजी बीके चौक येथे भव्य स्वाक्षरी अभियानास सहभाग मोठ्या संख्येने नोंदवावा असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते प्रविण डी. वाहुरवाघ यांनी प्रसिद्ध माध्यमातून कळविले आहे.
