जास्तीत जास्त समाज बांधव व वधू – वरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन .
अकोला / पातूर : अकोला शहर हिंदू खाटीक बहुउद्देशीय समाजसेवा संस्था अकोला रजि. नंबर एफ ६१० / २००६ यांच्यावतीने हिंदू खाटीक समाजाच्या वधू वर परिचय मेळाव्याचे निशुल्क आयोजन व नवनिर्वाचित व गुणवंतांचा सत्काराचे आयोजन
पोलीस मल्टीपर्पज हॉल निमवाडी , पोलीस वसाहत , पेट्रोल पंप सिंधी कॅम्प अकोला येथे आज शनिवारी दी.२१ डिसेंबर २०२४
रोजी करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधव, व वधू – वरांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक व समस्त अकोला जिल्हा खाटीक समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य अरुण खिरडकर, विशेष मार्गदर्शक अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार, कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना उबाठाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांच्या हस्ते करण्यात येईल. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल हरणे, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नवनिर्वाचित आमदार गजाननराव लवटे, माजी खासदार तथा विधान परिषद आमदार कृपालजी तुमाने , नवनिर्वाचित आमदार सचिनराव कांबळे, यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी सर्वप्रथम नाव नोंदणी सकाळी नऊ वाजता पासून सुरुवात करण्यात येणार आहे.
सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन जिल्हाधिकारी तथा लोकप्रतिनिधी, संस्थेचे पदाधिकारी व निमंत्रित पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती व डॉ. संतुजी लाड,
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.
त्यानंतर सरस्वती स्तवन प्रा.डॉ. गोविंद एललकार व मोनिका ढोके हे करतील.
मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .
यामध्ये सहभाग सौ .चंदाताई गोतरकर, श्रीमंती अंजली पारडे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नानासाहेब वानखडे करतील , त्यानंतर वधू-वरांचा परिचय देण्यात येईल.
व त्यानंतर माजी प्राचार्य अरुण खिरळकर यांचे अध्यक्षीय भाषण करतील व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उमेश दुर्गे करतील.
कार्यक्रमाच्या समारोपा नंतर लगेच उपस्थित मान्यवरांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. तरी जास्तीत जास्त हिंदू खाटीक समाजबांधव व वधू वर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अकोला शहर खाटीक समाज बहुउद्देशीय संस्था अकोला, व समस्त हिंदू खाटिक समाज अकोला जिल्हा बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.