ग्रा पं सरपंच व पं स उपसभापति यांच्या पत्राची विभाग नियंत्रकांनी घेतली दखल
आलेगाव दी ७ प्रतिनिधि येथील जुने बसस्थानक परिसरातील अडचनिंमुळे,रा,प,मंडळाच्या बस फेर्या गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या बस फेर्या ग्रा पं सरपंच गोपाल महल्ले व पं स उपसभापति ईमरान खान मुमताजखान यांच्या पत्राची दखल रा प विभाग नियंत्रकांनी घेऊन पूर्ववत सुरु केल्यापातुर तालुक्यातील आलेगाव येथील जुने बसस्थानक परिसरा मध्ये दुकानांची वाहतुकीच्या रस्त्या पर्यत रेलचेल त्यात दुचाकी सह चारचाकी वाहनांचा सततचा अद्थड़ा व्हायचा यामुळे बस कामगारानी रा प विभाग नियंत्रक यांचे कड़े दिलेल्या तक्रारी नुसार येथील जुने बसस्थानक परीसरामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून बस फेर्या बंद करण्यात येऊन सदर बस फेर्या जुने बसस्थानक पासून १ की मि लांब असलेल्या छत्रपति शिवाजी म चौका पर्यन्त बस फेर्या यायच्या यामुळे विद्यार्थी वयस्क महिला पुरुष मंडळींना खुप त्रास सहन करावा लागत असे यामुळे वयस्क मंडळींची चांगलीच दमछाक व्ह्यायची प्रवाशांचा सदर त्रास दूर व्हावा या अनुषंगाने ग्रा पं सरपंच गोपाल गणपतराव महल्ले व पं स उप सभापती ईमरान खान यांनी अकोला रा प विभाग नियंत्रक यांना दी २२ जून रोजी पत्र देऊन सदरहु बस फेर्या जुने बसस्थानक परिसरामध्ये फिरकत नसल्यामुळे विद्यार्थी,वयस्क मंडळींना त्रास सहन करावा लागत असून जुने बसस्थानक परिसरातील अडचणी ग्रा पं प्रशासनाने दूर केल्या असून लक्जरी मालवाहु ट्रक यांची वर्दळ सुरु आहे.तरी गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या बसफेऱ्या सुरु करूण प्रवाशांचा त्रास दूर करावा त्या नुसार दी ६ जुलै रोजी जुने बसस्थानक परिसरामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार बस चालक जहूर खान व् बस वाहक सुनील महल्ले यांनी बसस्थानक परिसरामध्ये बस आणली या वेळी पं स उपसभापति ईमरान खान यांनी बस चालक व वाहक यांचे पुष्पहाराने स्वागत केले.या वेळी पत्रकार अब्दुल कदीर, नय्यर खान,श्रीध लाड, मो.इमरान तसेच सैय्यद अबरार भाई , मो.आसिफ हजर होते.जुने बसस्थानक परिसरा मध्ये बस्फेर्या सुरु झाल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
एका वर्ष पासून नागरिक सहन करत होते त्रास.
आलेगांव बसस्थानकावर मंगील एका वर्षा पासून बस फेर्या बंद असल्याने बाहेरगाव शिकण्या साठी जात असलेले विधर्तियांना नाहक त्रास सहन करावे लागत होते सोबतच वयुरुढ नागरिकांना सुद्धा एक किमी पाय चालून बस पकडावी लागत होती.
छत्रपति शिवाजी म चौक ते जुने बसस्थानक परिसर गजबजलेला असल्यामुळे,चारचाकी दुचाकी वाहन चालकांनी आप आपली वाहने रास्त्यावर ऊभी न करता रस्ता सोडून उभे करुण पोलिस व ग्रा पं प्रशासनाला सहकार्य करावे.
गोपाल महल्ले
ग्रा पं सरपंच आलेगाव