साने गुरुजी मंडळ,पातूर व स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठान व्दारे लोकजागृती
पातुर प्रतिनिधी – पातूर येथील स्व.नामदेवराव राखोंडे (गुरुजी) साहित्य नगरी मध्ये ६२ वे अ.भा.अंकुर मराठी साहित्य संमेलनाचे दोन दिवसीय आयोजन डॉ.एच.एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय,पातूर येथे दि.११ व १२ मे २०२५ रोजी करण्यात आले होते.

यावेळी सर्वप्रथम पातूर शहरामध्ये साने गुरुजी मंडळ,पातूर व स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण कडुन त्यांच्या संचा व्दारे ग्रंथ दिंडी काढण्यात आली.

व पालखी मध्ये भारतीय विविध ग्रंथ व पुस्तके ठेवण्यात आली होती यावेळी ग्रंथाचे पूजन पातूरचे तहसीलदार डॉ राहुल वानखडे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण खंडारे,केंद्रीय अध्यक्ष हिम्मतराव ढाळे,तालुकाध्यक्ष नारायण अंधारे,प्रसिद्ध साहित्यिक श्री तुळशीराम बोबडे,प्रा.साधनाताई निकम, संमेलनाचे कार्यवाहक श्री देवानंद गहिले,डॉ.ममता इंगोले व साने गुरुजी मंडळाचे संस्थापक युवाश्री विशाल राखोंडे व पल्लवी मांडवगणे यांनी करून व पातूरचे तहसीलदार डॉ राहुल वानखडे यांनी ग्रंथ दिंडीला हिरवी झेंडी दाखवून दिंडीला सुरवात करण्यात आली.यावेळी युवा कलावंत तथा लोककवी सागर राखोंडे यांच्या नेतृत्वामध्ये आपले सांस्कृतिक पथक घेऊन त्यामध्ये शाहीर सुखदेव उपर्वट यांनी वासुदेवाची तर सिद्धार्थ इंगळे यांनी गाडगे बाबाची वेशभूषा करून ग्रंथ दिंडीचे आकर्षण ठरले तसेच साने गुरुजी मंडळाचे कलावंत शाहीर प्रकाश इंगोळे,गणेश देवकर,श्याम उगले,प्रज्वल भाजीपाले, किशोर राखोंडे,गजानन आवटे,समर्थ राखोंडे यांनी ग्रंथ दिंडी मध्ये विविध भजन व लोककगीत सादर केली व अकोला वरुन विशेष महिला भजन मंडळाने सातसंगत करुन भजनातुन सर्वांचे लक्ष वेधले व सदर ग्रंथदिंडी ही टी.के.व्ही चौक ते पोलिस स्टेशन चौक,मिलिंद नगर चौक,श्री संभाजी चौकातून होते डॉ एच.एन सिन्हा महाविद्यालय,पातूर येथे समारोप करण्यात आला.