प्रतिनिधी:- (संगीता इंगळे)
दि.१८ फेब्रुवारी २०२५
पातूर : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात १५९८ हून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

त्यांच्या तक्रारीची दखल घेत अकोला जिल्हा प्रशासनाने गुरुवारी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती गठित केली आहे. दरम्यान, या आरोपानंतर या प्रकरणातील तथ्य तपासण्यासाठी किरीट सोमय्या हे आज दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी पातूर पोलिस स्टेशनला भेट दिली.

या आधी सोमय्या यांनी असाच प्रकार अकोला शहरात झाल्याचा आरोप केला होता. यानंतर सोमय्या यांनी पातूरला भेट दिली. सदर दौऱ्यानंतर या प्रकरणी वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.