आगळ्या -वेगळ्या उपक्रमाने विज्ञान दिवस साजरा
पातूर प्रतिनिधी : पातुर येथिल किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे विज्ञान दिनाचे औचित साधून आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिकांची वेशभूषा साकारत त्यांनी लावलेल्या शोधांची संपूर्ण माहिती विशद केली.याप्रसंगी वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधाची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालिका ज्योत्स्ना गाडगे,मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे.विज्ञान शिक्षक हरिष सौंदळे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमावर आधारित विविध वैज्ञानिक प्रात्यक्षिके सादर केली.इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा व वैज्ञानिक कारणे याची सांगड घालणारी नाटिका सादर करून प्रबोधन केले.

त्यानंतर अभ्यासक्रमावर आधारित विज्ञान विषयातील प्रश्नमंजुषा ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, विज्ञान विभागाचे हरिष सौंदळे,प्रतीक्षा भारसाकळे, रेश्मा शेंडे यांच्यासह नीतू ढोणे,संकल्प व्यवहारे,नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबळराव,अविनाश पाटील,रविकिरण अवचार, पंकज आवचार,शितल गुजर,ऋतुजा अवचार,नेहा उपर्वट,नयना हाडके,स्वाती वालोकार,प्रियंका चव्हाण,पुजा खंडारे,प्रचाली थोराईत,इकरा अदिबा आलियार खान,योगिता शर्मा,अक्षय तायडे,नयना पटोले,रूपाली पोहरे,कल्पना वानेरे, शुभम पोहरे,मधुकर बोदडे आदींनी परिश्रम घेतले.