किड्स पॅराडाईज मध्ये रंगले महिला संमेलन
पातूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे महिला संमेलन उत्सहात पार पडले. यावेळी महिलांसाठी पार पडलेल्या विविध स्पर्धा, विविध उपक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा मीराताई तायडे होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका वर्षाताई बगाडे, तुळसाबाई गाडगे,वाहन उपनिरीक्षक चैत्राली गव्हाणे,शाळेच्या मार्गदर्शक श्रीमती सरस्वती गाडगे,शाळेच्या कार्यकारी संचालिका सौ.ज्योत्स्ना गाडगे प्रामुख्याने उपस्थित होत्या. तर सत्कारमूर्ती म्हणून वीज क्षेत्रातील कर्तबगार महिला म्हणून वंदना देवकर, संगीता बंड,सपना सुरवाडे,शुभांगी हेरोडे, उद्योजक पूनम तायडे, बाल किर्तनकार ख़ुशी भवाने आदीची उपस्थिती होती.यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा पार पडल्या.यामध्ये रांगोळी स्पर्धा,डान्स मॉम विथ डॉटर, फॅशन शो, टॅलेंट शो यासाह विविध मनोरंजक खेळांचा आस्वाद महिलांनी यावेळी घेतला.उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.प्रास्ताविक शाळेच्या कार्यकारी संचालिका सौ.ज्योत्स्ना गाडगे यांनी केले.संचालन श्रावणी गिऱ्हे, अमृता शेंडे यांनी केले.तर नितु ढोणे यांनी आभार मानले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते सत्कारमुर्ती महिला यांचा सत्कार करण्यात आला.दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रामेश्वर बरगट यांनी उपस्थित महिलांना ग्रामगिता मधील महिलोन्नती अध्याय वाचण्याचे आवाहन केले.यावेळी सेवा समितीचे प्रल्हाद निखाडे,शाळेचे संस्थापक गोपाल गाडगे उपस्थित होते.

या महिला संमेलनाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नीतू ढोणे, संकल्प व्यवहारे,नरेंद्र बोरकर,बजरंग भुजबळराव,अविनाश पाटील,हरीष सौंदळे,रविकिरण अवचार, पंकज आवचार, प्रतीक्षा भारसाकळे ,शितल गुजर, ऋतुजा अवचार,नेहा उपर्वट,नयना हाडके,स्वाती वालोकार,प्रियंका चव्हाण,पुजा खंडारे,प्रचाली थोराईत ,रेश्मा शेंडे,इकरा अदिबा आलियार खान, योगिता शर्मा,अक्षय तायडे,नयना पटोले, रूपाली पोहरे,कल्पना वानेरे, शुभम पोहरे,मधुकर बोदडे यांनी परिश्रम घेतले.