बोडखा ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जमाती करिता चार घरकुल हे शासनाकडून मंजूर करण्यात आले हे चारही घरकुल सरपंचांनी आपल्या नात्यातील लोकांना दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे याबाबत तक्रार सुद्धा करण्यात आली आहे येथील ग्रामपंचायत मध्ये सात सदस्य बॉडी असून सरपंचाची निवड नागरिकांमधून झाली आहे. गेल्या वर्षभरात चार घरकुल मंजूर झाले. हे घरकुल आपल्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप बोडखा येथील प्रतिष्ठित नागरिक राज रामभाऊ बोरकर यांनी आपल्या तक्रारीतून आरोप केला आहे तसेच 15 वित्त आयोगांमधून एका वर्षांमध्ये किती खर्च करण्यात आला त्याचा हिशोब सुद्धा माहिती अधिकारा अंतर्गत मागण्यात आला असून बोडखा ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशीची मागणी नागरिकांमधून होत आहे
