पातुर प्रतिनिधी :- पातुर शहरातील जुने बस स्थानकावरिल दिलकुश रेस्टॉरंटला आज अचानक भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी,असा अंदाज व्यक्त केला जात आहे.विद्युत महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होता.शहरात ट्री कटिंग च्या नावाखाली झाडांची छाटणी सुरू असतांना दिलखुश रेस्टॉरंट च्या वरती झाडांची छाटणी करून झाडाच्या फांद्या ह्या रेस्टॉरंटच्या तीन पत्रावर पडल्या होत्या.तारेचे घर्षण होऊन या फांद्यांना आग लागली होती.यावेळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली आगीची माहिती मिळताच पातुर नगरपरिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी,नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.स्थानिक नेते आणि शेकडो युवकांनी धाव घेतली आग लागल्याची घटना समजताच पातुर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष हिदायत खान, माजी नगरसेवक एजाज भाई बब्बू डॉन,गुड्डू पैलवान,मेहताब यांच्यासह शेकडो युवकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यात सहभाग घेतला.
घटनास्थळी पातुर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी सय्यद अहेसानोद्दीन,अग्निशमन चे अशपाक भाई,प्रल्हाद वानखडे,मुद्दतसीर सह इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि आवश्यक ती मदत पुरवली.
महावितरण चे शहर अभियंता बोरकर हे मुख्यालयात गैरहजर होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी फोन केला असता मोबाईल बिझी मोडवर करण्यात आल्याचे दिसून आले.नागरिकांमध्ये असंतोष घटनास्थळी महावितरण चे महिला कर्मचारी सपना सुरवाडे प्रवीण तायडे व राजू सौंदळे यांनी विद्युत पुरवठा खंडित केल्याने आगीवर नियंत्रण मिळाले