पातुर प्रतिनिधी :- आगामी सण उत्सव निमित्त श्री राम नवमी,संत श्री सिदाजी महाराज यात्रा,संदल,उर्स,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्ताने पातुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन येथे 5 एप्रिल रोजी शांतता समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेला महसूल विभाग प्रमुख म्हणून नायब तहसीलदार बळीराम चव्हाण,उपनिरीक्षक बंडूजी मेश्राम उपनिरीक्षक अभिषेक नवघरे,पातुर नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष हिदायत खान,माजी उपाध्यक्ष राजुभाऊ उगले,पत्रकार मंडळी तसेच शांतता समितीचे सदस्य,संत श्री सिदाजी महाराज संस्थान मंडळ चे सदस्य,
संदल,उर्स,उत्सव मंडळ सदस्य,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ चे सदस्य,शहाबाबु दर्गा मंडळ सदस्य,तसेच पातुर शहरातील सर्व धर्माचे नागरिक या सभेला उपस्थित होते.

हिदायत खान,राजू उगले,पत्रकार प्रदीप काळपांडे,देवानंद गहिले, इरफान जागीरदार,शेख मुख्तार,बळीराम खंडारे, रुस्तम गवई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या सभेचे प्रास्ताविक उपनिरीक्षक अभिषेक नवघरे यांनी केले तर सूत्रसंचालन खूपीया हिम्मतराव डिगोळे यांनी केले.