पातूर प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५व्या वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने आयोजित महाराष्ट्र गौरव रथ यात्राचा पातूर येथे भव्य स्वागत सोहळा पार पडला.

या ऐतिहासिक प्रसंगी राज्य मंत्री इंद्रनील नाईक,आमदार अमोल मिटकरी,आमदार संजय खोडके आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.यात्रेचे स्वागत अकोला जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुज्जमा यांच्या नेतृत्वात उत्साहात करण्यात आले. पातूर नगरीतील वली हजरत शाहबाबू व संत श्री सिदाजी महाराज यांची पवित्र माती कलशात समाविष्ट करण्यात आली,ज्यामुळे यात्रेला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान मिळाले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव मोहम्मद फरहान अमीन,मोहम्मद नजीब, कमरुज्ज़मा खान,मोहम्मद ऐजाज़,युवा नेते नातिक शेख,नईमखा आदिचे मोलाचे योगदान लाभले.