पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव येथे उपर्वट कुटुंबात मुलीच्या लग्नाच्या विषयावरून घरगुती वादातून लोखंडी पाईप ने मारहाण केल्याने मंगेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पातुर पोलीस स्टेशनला कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल. देऊळगाव येथे १६ डिसेंबर रोजी फिर्यादी मोहन सोनाजी उपर्वट यांच्या मुलाला नातीच्या लग्न या विषयावर बरेच दिवसापासून घरगुती वाद होता या वादाचे पर्यावसन मारहाणीत होऊन फिर्यादी मोहन उपरवट मुलगा मिलिंद हा गावातील हापशी जवळ उभा असताना विरोधी गटाचे परमेश्वर अशोक उपर्वट, प्रवीण अशोक उपर्वट ,रामेश्वर अशोक उपर्वट,मिलिंद भीमराव उपर्वट यांनी मंगेश यास लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याने मंगेश हा घटनास्थळी गंभीर जखमी झाला मंगेशला वडिलांनी उपचाराकरिता अकोला येथील साहारा हॉस्पिटल येथे भरती केले असता उपचारादरम्यान मंगेशचा मृत्यू झाला याबाबत ठाणेदार किशोर शेळके यांनी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केले असून आरोपीना तब्येत घेतले आहे. घटनास्थळी एस डी ओ गोकुळ राज यांनी भेट दिली असून पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत
