पातुर प्रतिनिधी (दिग्रस बु.) पातुर तालुक्यातील ग्रामपंचायत दिग्रस बुद्रुक येथील महिला सरपंच सौ आशा सुधाकर कराळे यांना अखिल भारतीय सरपंच परिषद द्वारा राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन यशदा चे माजी महासंचालक तथा माजी विभागीय आयुक्त श्री चंद्रकांत दळवी उपस्थित होते.प्रसिद्ध इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.