पोलीस स्टेशन उरळ जि. अकोला दि. ३१/१२/२०२३ रोजी पोलीस शिपाई दिनकर इंगळे हे त्यांची पो स्टे चे
शासकीय वाहन सेकंड मोबाईल क्र एम एच ३० एच ५४९ चालक पोलीस शिपाई नितेश मुंढे यांचे सह पो स्टे परिसरात नाईट पेट्रोलींग ड्युटी करीत असतांना रात्रीला दोन ते तीन वा. दरम्यान ग्राम मांजरी फाटा ते कंचनपुर रोड येथे त्यांना दोन मोटार सायकल वर चार
इसम संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्यांनी शासकिय वाहनासह नमुद मोटार सायकल चा पाठलाग केला असता एक मोटार सायकल वरील पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याचे पाठीवरील लांब शस्त्र काढून पाठीमागे न पाहता लांब शस्त्रामधुन फायर केल्याचा आवाज आला तरीसुद्धा शासकिय वाहनाने त्यांचा पाठलाग केला असता ते मोटार सायकल घेवुन पळून गेले. त्यांनतर गाडी थांबवुन वाहनाची पाहणी केली असता गाडीच्या समोरील काचाला छररे लागल्याने ०८ छिद्रे पडलेले दिसुन आले. असा पोलीस
शिपाई दिनकर इंगळे यांनी पो स्टे ला दिलेल्या लेखी रिपोर्ट वरून दोन मोटार सायकल वरील चार अज्ञात इसमांविरूद्ध पो स्टे ला अप नं ४३२/२३ क ३५३,३३६, ३४ भादंवि सह क. ३,२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास सपोनि गोपाल ढोले करीत आहे, या गुन्ह्यातील आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
