पातूर दि 12/01/2024
डॉ.वंदनाताई ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात मध्ये स्वराज प्रेरिका *राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्सव कार्यक्रममोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*. या कार्यक्रमाची संकल्पना व आखणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची होती.या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर विद्यार्थ्यांनी भक्ती गीत व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहितीपर भाषणे दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.गायत्री मावळे,मुख्य अतिथी उपप्राचार्य डॉ.अभय भुस्कडे व डॉ.शैलेश पुंड व प्रा.प्रशांत निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉ. मनीष खंडारे ,डॉ.तुषार काकर, मनोहर उगले, प्रा.प्रशांत लोथे, संदीप गिऱ्हे,बाळू राऊत, फुलसिंग राठोड या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमात लक्ष्मण नरवटे,संजना भोजने, लक्ष्मीकांत पर्डे,आनंदी बेले रोहिणी नगराळे या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.मृदुला भगत येणे भक्ती गीत सादर केले. श्री.मनोहर उगले यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊ यांचे राष्ट्रप्रेम व निर्भयता विषयी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात डॉ.गायत्री मावळे मॅडम यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे धैर्य,परोपकार,आत्मविश्वास, शौर्य याविषयी माहिती दिली विश्वास ठेवणे आहे योगदानाबद्दल बद्दल आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे नियोजन सौरभ बोऱ्हाडे,प्रणव महाजन,उमेश चौधरी,निखिल इंगळे,आशिष शिंदे,सुजल शिंदे,हर्ष बैद,रजत धनमंते,हर्षदा राठोड,भक्ती पाटील सेजल चौखे,ऋषाली मुसळे या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश पोहरे,प्रथम वर्ष विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी परीश्रम घेतले.