
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांच्या आदेशावरून पातुर परिसरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून पातुर पोलिसांनी 200 च्या वर वाहनावर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख 39 हजार रुपयांचा दंड वसूल केला. पातुर पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाने ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पातुर शहराच्या मुख्य मार्गावर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकवर कारवाई करण्यात आली यामध्ये मोठ्या आवाजात सायलेन्सर वापरणारे वाहनधारक 6, फॅन्सी नंबर प्लेट 47, ट्रिपल सीट वाहनधारक 72 व १०८ इतर किसेस करून पातुर पोलिसांनी 233 वाहनधारकावर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख 39 हजार रुपयाचा दंड वसूल केला. यावेळी पातुरचे ठाणेदार किशोर शेळके यांनी वाहनधारकांना आपली वाहने अल्पवयीन मुलांना चालविण्यात देऊ नये, हेल्मेटचा वापर करावा, ट्रिपल सीट वाहन चालू नये, वाहनांची कागदपत्रे व ड्रायव्हिंग लायसन सोबत बाळगण्याचे आवाहन ठाणेदार यांनी केले. सदर कारवाई ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पो हे कॉ मनोज ठाकूर ना पो कॉ शेख वसीम ,पो कॉ चिकटे यांनी केली
