फरहान अमीन यांनी संविधान उद्देशिकेच्या पत्रकाचे केले वाटप.
पातुर प्रतिनिधी :- 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अजित पवार गटा कडून पातुर येथे संविधान जनजागृती व आम्ही बाबासाहेबांचे पाईक तथा संविधान उद्देशिका पत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी विविध शैक्षणिक संस्था व सामाजिक घटकांना करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व आमदार अमोल मिटकरी यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिलेल्या कार्यक्रमानुसार हा उपक्रम पातुर शहरात राबविण्यात आला.देशाला बलशाली बनवायचे असेल तर हा देश एकजुटीने राहणे गरजेचे आह.त्यासाठी संविधानाचे महत्त्व अनन्य साधारण आहे देशाच्या एकात्मतेसाठी संविधान किती गरजेचे आहे याचे महत्त्व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव मोहम्मद फरहान अमीन यांनी सांगितले 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.