तेल्हारा दि. ७ (ता, प्र.)तेल्हारा येथील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध अधिवक्ता अँड. मनोज सत्यनारायण राठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील सर्वस्पर्शी विकास कामाने प्रभावित होऊन शनिवार दि.६ एप्रिल रोजी तेल्हारा येथे अकोला जिल्हा भाजपाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा स्थापना दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला.
भाजप प्रवेशित अँड.मनोज सत्यनारायण राठी यांचे जिल्हा भाजपाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी भाजपचा दुपट्टा देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षवाढ व भाजपाच्या ध्येय धोरणानुसार तन-मन-धनाने कार्य करण्याचा विश्वास यावेळी अँड.मनोज राठी यांनी व्यक्त केला या प्रसंगी तेल्हारा तालुका भाजपाध्यक्ष गजानन उंबरकार शहर भाजपाध्यक्ष महेंद्र गोयनका, माजी जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड गजानन नळकांडे,अनिल पोहने,धर्मेश चौधरी, अनुप मार्के,सुनिल राठोड,अतुल विखे, रवी शर्मा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.