दि.३०(ता प्र)
दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता केशवलाल शहा स्टेडियम बजरंग चौक माळेगाव नाका तेल्हारा येथे संपन्न होत आहे
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार डॉ संजय कुटे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रकाश भारसाकळे ,अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख अनुप संजयराव धोत्रे, भाजपा महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून बाबुराव विखे, ठाणेदार सचिन यादव, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन उबंरकार, नायब तहसीलदार निलेश राणे माजी मुख्याध्यापक प्रकाश चव्हाण, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तथा विद्यमान संदिप खारोडे, बाजार समिती संचालक सुभाष खाडे, जेष्ठ नागरिक लक्ष्मणराव ठोबरे, पांडुरंग पवार, सेवा निवृत्त शिक्षक नारायणराव पवार खरेदी विक्री संस्थेचे उपाध्यक्ष राजेश्वर टोहरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लखन राजनकर माजी नगरसेवक मंगेश सोळंके राहणार आहेत
पहिले अनुपदादा धोत्रे यांच्या कडून बक्षीस 71 हजार रुपये दुसरे बक्षीस 41 हजार रूपये संदीप पालीवाल, दिलीप पवार निखिल राठी महेन्द्र भोपळे संजय शर्मा यांच्या कडून तिसरे बक्षीस तेल्हारा तालुका खरेदी विक्री संस्थेचे उपाध्यक्ष राजेश्वर टोहरे यांच्या कडून स्व लीलाबाई टोहरे स्व रोहित टोहरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 21 हजार रुपये राहील चवथे 11 हजार रुपये सुरेंद्र विखे गजानन देशमुख नरेंद्र विखे नारायण देशकर याच्या कडून देण्यात येणार आहे या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जय बजरंग मंडळ तेल्हारा (खुर्द) व जय बजरंग क्रिकेट क्लब तेल्हारा यांनी केले आहे.