केद्रशासनाने संसदेत कायदा संमत करून जुने भारतीय कायदे, भारतीय दंड संहिता १८६०, फौजदारी प्रकीया संहीता १९७३ व भारतीय पुरावा कायदा १८७२ यांच्यात बदल करून अनुक्रमे नविन कायदे, भारतीय न्याय संहिता-२०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३, व भारतीय साक्ष अधिनियम-२०२३ हे तीन नविन कायदे तयार करून ते संमत झाले आहेत. सदर कायदे संपुर्ण देशपातळीवर लवकरच लागु होणार आहेत.

त्या पार्श्वभुमीवर अकोला पोलीस दलात कार्यरत अधीकारी व अंमलदार यांना नविन कायदयाबाबत माहीती व्हावी याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक, यांनी आज दिनांक १७/०२/२०२४ रोजी विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथे कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेकरीता नथमल गोयनका लॉ. कॉलेज, अकोला येथिल प्राध्यापक अॅड. श्री. सुजीत सोळंके अॅड. श्री. राजेश्वर देशपांडे अॅड. श्री. व्यंकटेश देशपांडे हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित अधीकारी व अंमलदार यांना नवीन कायदयाचे सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये प्राध्यापक अॅड. श्री. राजेश्वर देशपांडे यांनी भारतीय न्याय संहिता-२०२३ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी जुन्या व नव्या कायदयाचे तुलनात्मक विश्लेषण करून नविन कायदा हा पिडीत यांना केंद्रस्थानि माणुन तयार करण्यात आल्याचे सांगीतले नविन भारतीय न्याय संहितेत एकुण ३५८ कलमांचा समावेश आहे.

प्राध्यापक अॅड. श्री. सुजीत सोळंके यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ याबाबत मार्गदर्शन केले. अॅड.श्री. व्यंकटेश देशपांडे यांनी भारतीय साक्ष अधीनियम याविषयातील कायदेशीर बाबीवर मार्गदर्शन केले. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी अध्यक्षीय भाषणातुन तीनही कायदयावर मार्गदर्शन केले सदर कार्यशाळेकरीता अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच अकोला जिल्हयातील उपविभागीय पोलीस अधीकारी तसेच सर्व ठाणे प्रभारी तसेच शाखा प्रमुख यांची कार्यशाळेला उपस्थिती होती.