कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुनिल डिसले (बारामती), प्रा.बाळासाहेब माने सचिव( मुंबई) प्रा.डाॅ.मनीषा रिठे कार्याध्यक्ष (वर्धा)यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत अकोला जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामधे *अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून प्रा.निलेश उद्धवराव पाकदुणे तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे

. तर सचिव पदी प्रा.संजय गोळे प्राजक्ता कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अकोला यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी प्रा.अमोल इंगोले सर,यांची निवड झाली आहे.उपाध्यक्ष म्हणून प्रा.श्रीराम पालकर सर, प्रा.दिपाली भुईभार मॅडम, प्रा.राहुल महाजन सर, प्राचार्य.विलास बेलूरकर सर, हे काम पाहणार आहेत. कोषाध्यक्षपदाची प्रा.गणेश सातपुते सर व प्रा.अमोल जती सर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.समन्वयक म्हणून
प्रा.संजय म्हैसने सर,
प्रा.सुनिता डाबेराव मॅडम यांची तर सहसचिव
पदी प्रा.अश्विनी बाहकर मॅडम, प्रा.विवेकानंद सावंत सर, प्रा.प्रशांत डोईफोडे सर, प्रा.सुरेश झामरे सरांची निवड करण्यात आली आहे.
सल्लागार सद्स्यपदी प्रा.डॉ.लता थोरात मॅडम, प्रा.डी.एस.राठोड सर, प्रा.अनिल शेलकर सर तथा प्रा.पांडुरंग चौधरी सर निवडले गेले आहेत.
अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांचे प्रतिनिधी सुद्धा यावेळी महासंघाने घोषीत केले. यामधे अकोला महानगर अध्यक्ष प्रा.निलिमा भगत मॅडम अकोला ग्रामीण अध्यक्ष -प्रा.वासुदेव डांगे सर, अकोट तालुकाध्यक्ष प्रा. सदानंद बाणेरकर सर,
बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष प्रा.वैशाली देशमुख मॅडम, बाळापुर तालुकाध्यक्ष प्रा.संतोष हाडोळे सर, मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष -प्रा.अरविंद मनोहर सर, पातुर तालुकाध्यक्ष प्रा. विनय खंडारे सर व तेल्हारा तालुकाध्यक्षपदी प्रा.संतोष गावंडे सर यांची महासंघाने निवड जाहीर केली. तर कार्यकारणीच्या सदस्यपदी अकोला जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अध्यापन करणारे सर्व पूर्णवेळ,अर्धवेळ व घड्याळी तासिकेवरील मराठी विषय शिक्षक असणार आहेत.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मराठी विषय हा कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर अनिवार्य करावा, तसेच मराठी शिक्षक अतिरिक्त ठरू नये याकरिता मराठी विषयाच्या तासिका व कार्यभाराच्या संदर्भात नवे धोरण शासनाने अमलात आणावे याकरिता शासन दरबारी महासंघाच्या वतीने लढा येणार आहे. याकरिता जिल्ह्यातून बळ मिळावे याकरिता अकोला जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. मराठी भाषेसाठी, मराठी विषयासाठी व मराठी शिक्षकांसाठी ही कार्यकारणी निश्चितच चांगले काम करणार असून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाला जिल्हा कार्यकारिणीचे चांगले पाठबळ मिळणार आहे. नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.