पातुर प्रतिनिधी…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्ताने व तसेच आगामी सण उत्सव व कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा अबाधित राहण्याकरिता तसेच शहरात शांतता प्रस्थापित राहण्याकरिता
अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या आदेशावरून बाळापुर उपविभागीय अधिकारी गोकुळ राज यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या उपस्थितीत
१५ फेब्रुवारी रोजी पातुर पोलीस स्टेशनच्या वतीने पातुर शहरातून मुख्य मार्गाने पोलिसांचे पतसंचलन करण्यात आले.

या वेळी पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके सह उपनिरीक्षक अभिषेक नवघरे, पातुर १६ पोस्टेचे पोलीस अमलदार कर्मचारी,अकोला आरसीपीचे एक पोलीस अधिकारी व १५ पोलीस अमलदार अकोला पोलीस मुख्यालयाचे ९९ पोलीस अमलदार,२ बीट मोटार सायकल व

४ पोलिस वाहनासह पातुर शहरातील मुख्य मार्गाने बाळापुर रोड ,जुने बस स्टॅन्ड चौक मिलिंद नगर चौक,संभाजी चौक, सिदाजी वेताळ,भोई वेटाळ,ते भगत वेटाळ,चिरा चौक,देवडी मैदान,प्राथमिक आरोग्य केंद्र, मीश्रीशा दर्गा,ते गुरुवार पेठ,आठवडी बाजार रोड मार्गे पोलिस स्टेशन ला परत अशाप्रकारे पोलिसांचा रूट मार्च करण्यात आला.