बाळापुर मतदार संघामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून विकासापासून कोसो दूर असलेले बाळापूर मतदारसंघ ,! या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख हे निवडून येताच बाळापुर मतदारसंघाचा त्यांनी कोट्यावधी रुपये निधी खेचून आणून न भूतो न भविष्यती असा विकास केला ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये त्यांनी विकास केला असून त्यांच्या कार्याची पावती त्यांना मिळत आहे

आठ जानेवारी रोजी पातुर शहरामध्ये आठ कोटी 50 लाखाच्या विकास कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहाने पार पडणार असून या कार्यक्रमाला हजारो शिवसैनिक नागरिक उपस्थित राहण्याचे आवाहन शहर प्रमुख निरंजन बंड यांनी केले आहे. बाळापूरचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मा नितीनजी देशमुख यांच्या प्रयत्नाने मंजूर पातूर शहरातील ₹ ८कोटी ५०लक्ष च्या विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा दि ८जाने सोमवार रोजी गाडगेवाडी श्री नंदु येनकर यांचे घरासमोरील शासकिय बगीचा आवार भिंत, पथदिवे, सभागृह व सौंदर्यीकरण करणे , ₹ २ कोटी ५०लक्ष स्वामी समर्थ केंद्र पातूर येथे शासकीय जागेवर सभागृह बांधकाम करणे ₹ ५० लक्ष साई मंदिर खानापूर रोड येथील शासकीय मोकळ्या जागेत आवारभिंत सभागृह पथदिवे सौंदर्यीकरण करणे
₹ २ कोटी आरीफनगर श्री शंकरराव नाभरे यांचे घरासमोरील शासकीय जागेत पथदिवे ,आवारभिंत सभामंडप व सौंदर्यीकरण करणे ₹ २ कोटी ५०लक्ष
श्रीप्रकाश पांडुरंग चवरे रामनगर पातूर शासकीय जागेवर सभागृह बांधणे ₹ १ कोटी क्या कामाचे भूमिपूजन होणार आहे