पातुर तालुक्यातील सोशल मीडियावर ग्रामपंचायत चा भ्रष्टचार संबंधित जीआर फिरतो सोशल मीडियावर! पातुर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचे गावागावात विरोधक आरोप करीत आहेत याबाबत ग्रामपंचायत सरपंच, सचिव, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेला संयुक्त भ्रष्टाचार याबाबत शासनाने सन 2013 ला शासन परिपत्रक काढले होते या शासन परिपत्रकाची विरोधक आपापल्या गावामध्ये सोशल मीडियांच्या व्हाट्सअप ग्रुप वर प्रसिद्धी करून सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्याचं काम करीत आहेत. या जीआरचा प्रत्येक गावामध्ये विषय चर्चेला जात असून आता ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारची जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी न करता दाबण्याचा प्रयत्न केल्यास याबाबत कुठे , कोणत्या प्रकारे तक्रार करायची याची माहिती या या परिपत्रकामध्ये आहे त्यामुळे सत्ताधारी यांचे धाबे दणाणले आहे.
