आज 22 डिसेंबर रोजी शे.अफ्फान ला बेपत्ता होऊन चार दिवस झाले शोधा शोध करुन कुठेही शे.अफ्फानचा थांगपता लागत नसल्याने हतबल होऊन शेवटी शे.अफ्फानचे वडील शे.याकुब बागवान यांनी शे.अफ्फानला आणून देणा-यास किंवा खात्रीशीर माहीती देणा-यास 1 लाख रुपये रोख बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच बार्शीटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते सै.अबरार सै.मीर यांनीही 51 हजार रुपये बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे असे एकुण 1,51,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.19 डिसेंबर पासुन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी आणी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल वाघ सर,बंडू मेश्राम सर आणी पोलीस कर्मचारी आणी नातेवाईकांसह स्थानिक नागरिकही अतिशय बारकाईने शोध घेत आहेत परंतु कुठेही शे.अफ्फानचा थांगपता लागत नाही 21 डिसेंबर रोजी जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी पतंग तुटल्या नंतर परीसरातील लहान लहान पतंग आणण्यासाठी पतंग मागे जिथं जिथं गावातील मुले धावत धावत जातात तीथ तीथ या शंकेवरुन परीसरातील अडीअचणीच्या ठीकाणी तसेच शेत व शेतातील विहीरींमधे गळ टाकुन शोध घेतला असता काही मिळुन आले नाही अजुनही सर्वत्र शोध घेणं चालुच आहे अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.19 डिसेंबर रोजी. शे.अफ्फान शे.अय्युब बागवान (लस्सीवाले) वय 7 वर्ष राहणार बागवान पुरा पिंजर ता.बार्शीटाकळी जिल्हा अकोला येथील अंगात आकाशी रंगाचे चे टी शर्ट आणी काळ्या रंगाची जीन्स पॅण्ट वर्ण गोरा अशा वर्णनाचा मुलगा दोन वाजता पासुन घरुन निघुन गेला आहे. कुणाला हा मुलगा दीसुन आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती 📲 *संपर्क 1.. *दिपक सदाफळे (जिवरक्षक) पिंजर मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन महाराष्ट्रा 📲 मो.नं.9822229471 *संपर्क 2शे.जबीउल्ला बागवान मो.नं. 7028282135
