पातूर (प्रतिनिधी)- दिवसेंदिवस मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या घसरत असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर दुसरीकडे पातुर येथील लक्ष्मीबाई देशपांडे शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात पटावर विद्यार्थी आहेत आणि म्हणूनच लक्ष्मीबाई देशपांडे पातुर या शाळेचा आदर्श घ्यावा”असे प्रतिपादन अमरावती विभाग शिक्षक आमदार माननीय किरणजी सरनाईक यांनी केले.

लक्ष्मीबाई देशपांडे शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई देशपांडे वरिष्ठ प्राथमिक शाळा पातूर येथे नुकतेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नुकतेच स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्था झरंडी चे संस्थापक/ अध्यक्ष आदरणीय रामसिंग जाधव साहेब होते.तसेच उद्घाटक म्हणून अमरावती विभाग शिक्षक आमदार आदरणीय किरणजी सरनाईक,पातुर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी शोभा मेहेर,शिक्षण विस्तार अधिकारी डाबेराव साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका कु.वंदना सरप तसेच शाळेच्या अधिष्ठ शिक्षिका देशमुख आदी सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारर्पण, दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या नंतर मुख्याध्यापिका कु. वंदना सरप यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणामधून शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली व शाळेच्या प्रगतीचा आलेख सर्व पालक व विद्यार्थ्यांसमोर आपल्या प्रास्ताविक वर भाषणातुन मांडला. मा.आमदार श्री किरणजी सरनाईक साहेब,पातुर पं.स. गटशिक्षणाधिकारी शोभा मेहेर,शिक्षण विस्तार अधिकारी डाबेराव तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रामसिंगजी जाधव साहेब यांनी आपल्या भाषणामधून शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी होत असलेल्या विविध उपक्रमा ची स्तुति केली व सर्व स्नेहसंमेलनात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन श्री सानप यांनी केले तर मान्यवरांचे आभार श्री शिरसाट यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती सरलाताई लाखाडे,श्री. डाखोरे,श्री.सानप,श्री. शिरसाट , श्री. राठोड , श्री. घोरे,श्री पोहरे,कॉन्व्हेंट टीचर दिपाली वानखडे,शुभांगी माकोडे,दिपाली करंगाळे तसेच पोहरे ताई,तिडके ताई आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.