पातुर प्रतीनिधी:- संगीता इंगळे
दि 27/08/24 कलकत्ता येथील आर.के.कार मेडिकल कॉलेज मधील कार्यरत महिला डॉक्टरांवर झालेल्या अमानवीय बलात्कार व हत्याकांडाच्या विरोधात दोषी आरोपींवर तातडीने कारवाई व्हावी व सर्व डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी या मागणीसाठी पातूर येथील आमदार डॉ.राहुल पाटील एज्युकेशनल कॅम्पस च्या वतीने संभाजी चौक ते पातुर पोलीस स्टेशन दरम्यान शांतता रॅलीचे आयोजन मंगळवारी सकाळी 11 वाजता करण्यात आले होते.

पातुर पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार डोपेवाड यांनी वैद्यकीय विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून निवेदन स्वीकारले.

यावेळी महाविद्यालयाचे संचालक साजिद शेख सर,प्राचार्य डॉ.जयश्री काटोले उपप्राचार्य डॉ.अभय भुस्कडे,डॉ.गायत्री मावळे,डॉ.सुनिता कदम,डॉ शैलेश पुंड,डॉ.मोरे,डॉ.बेलूरकर,डॉ. वक्ते,डॉ.काकर,डॉ.शेंडे,
अधक्षक दत्तात्रय पणसकर,डॉ.वसीम,प्रशांत निकम,धनंजय मिश्रा,मंगेश गाडगे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वैद्यकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या रॅलीची पातुर पोलीस स्टेशनमध्ये सांगता करण्यात आली.पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार डोपेवाड यांना निवेदन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.