वर्षाचा सरते शेवटी असलेला 31 डिसेंबर रोजी नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने 31 डिसेंबर हा साजरा करतात. परंतु कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावा याकरिता पातुर पोलीस ऍक्शन मोडवर आले असून आज रात्री दारू पिणाऱ्यांनाची तपासणी करण्याकरिता चौका चौकामध्ये पोलीस गस्त घालणार आहेत. यावेळेस पातूर पोलिसांनी तळीराम करीता पातूर शहराच्या मुख्य चौकामध्ये एक पोलिसांचा गट तयार केला असून ते त्यावेळेस कडक बंदोबस्त करणार आहेत पातूर शरीरातील टी के व्ही चौक, संभाजी चौक, जुने बस स्थानक, गोंडवेस अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांचा चौक चौकात दारू पिणाऱ्यावर व आरडा ओरडा करणाऱ्यावर प्रतिबंधक कार्यवाही करण्याचे यावेळी पातुर पोलिसांनी कळविले आहे . नागरिकांनी 31 डिसेंबर हा शांततेमध्ये साजरा करावा आपल्या जीवितवस कोणत्या प्रकारचा धोका होणार नाही. दारूच्या नशेमध्ये अपघात होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी अशी आवाहन पातुर ठाणेदार किशोर शेळके यांनी केले आहे
