तेल्हारा (तालुका प्रतिनिधी)दि. ९ काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नाही,तर गुजरात मधील तेली जातील झाला आहे.त्यांनी कास्ट सेन्सेसला विरोध केला,कारण त्यांचा जन्म ओबीसीत झाला नसून सामान्य जातीत झालेला आहे.असे बेताल व निर्लज्ज उद्गार खा.राहूल गांधी यांनी ओरीसातील सभेत काढले. त्यामुळे त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी तेल्हारा तालुका व शहर भाजपाच्या वतीने शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सदर वक्तव्याचा निषेध करण्यात आला.तेल्हारा येथील शेगाव नाका स्थित उंबरकार कॉम्लेक्स येथे ९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजता माजी जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड यांच्या मार्गदर्शनात, तालुका भाजपाध्यक्ष गजानन उंबरकार, शहरध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी करुन निषेध सभा पार पडली. राहुल गांधी हे गांधी कुटुंबात जन्माला आले असून त्यांचा इटालियन कुटूंबाशी संबंध आहे. या लॉजिक प्रमाणे ते स्वतः भारतीय नागरिक ठरू शकत नाहीत काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षण विरोधात राहिली आहे. पंडील नेहरूंनी सन १९५३-५४ मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या शिफारशींचा विरोध केला होता. स्व. इंदिरा गांधी,स्व. राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला विरोध केला होता. राहूल गांधीच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत,कारण त्या सर्व पूर्वी सामान्य वर्गात होत्या- पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे. एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा अशा जातीमध्ये जन्म झाला त्यांचे आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस.तेली समाजाला ओबीसी पासून वेगळे करण्याचा आणी ओबीसीचा एक वर्ग कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. इतके वर्ष धर्म आणि जातीवरून फुट पडून ते आता ओबीसीमध्ये सुध्दा फुट पाडत आहेत अनेक राज्यात काँग्रेसने ओबीसींचे आरक्षण कमी केले. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा काँग्रेसने कधी दिलेला नाही. युपीए २ च्या सरकारमध्ये संपूर्ण कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून केवळ एकच ओबीसी व्यक्तीला स्थान देण्यात आले होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देता आले नाही.धनगर व गोवारी बांधवांच्या जमातीचा अनुसूचित जमाती आरक्षणबद्दल काँग्रेसनेच ओळ करून ठेवण्याचा आरोप निषेध सभेत व्यक्त करण्यात आला यावेळी सर्वश्री रवी गाडोदिया,गजानन गायकवाड,अनिल पोहने बालू पवार,विजय देशमुख,लखन राजनकर,गणेश इंगोले,राजेश बुरघाटे,सुनील भुजबले,गंगाधर खोडे,डॉ ऋषिकेश चोपडे,वासुदेव खारोडे, दीपक शिवरकार,राजेंद्र काळे,रवी शर्मा यांच्यासह ग्रामीण शहर भागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
