पातुर प्रतीनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रांताध्यक्ष मा. खासदार सुनिलजी तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा.कृष्णाभाऊ अंधारे यांच्या उपस्थिती मध्ये प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी उपस्थीत दीपक गावंडे,राम कुमार अमानकर,आनंदराव ठाकरे,सुधीर साखरकर गुरुजी, पवन गाढे, शुभम तिडके, विपुल ठाकरे, अबूताला अन्सारी, यांच्या सह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.मा खा सुनील जी तटकरे हे लोकसभेत प्रचंड बहुमताने विजयी झाल्या बद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मा तटकरे साहेबांच्या दीर्घायुष्य मिळण्यासाठी अनेक महिला पदाधिकारी यांनी देवाकडे प्रार्थना केली.
