आलेगाव:- दुर्धर आजाराला कंटाळून आलेगाव येथिल ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना आलेगाव येथे सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. राहत्या घरी युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले. प्रवीण सिद्धार्थ तेलगोटे (वय ३५) असे व्यक्तीचे नाव आहे.
युवकाची घरची परिस्थिती हालाखीची असून, त्याचे कुटुंब हातावर काम करणारे आहे. त्यांच्याकडे शेती नसल्याने ते शेतमजुरीचे काम करतात. आई-वडील, पत्नी हे लोकांकडे कामाला जाऊन मोलमजुरी करतात. आजपर्यंत त्यांनी प्रवीणवर उपचार केले. नुकतेच पुणे येथे त्याच्यावर उपचार झाले होते. सिद्धार्थ तेलगोटे यांचा प्रवीण एकुलता एक मुलगा होता. मुलाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण घराचा आधारस्तंभ हरवला आहे. त्याला दोन बहिणी असून, दोन्हीही बहिणीचे लग्न झालेले आहेत. घटनास्थळी चान्नी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला दरम्यान मृतदेह शवविच्छेदनसाठी अकोला येथे पाठविण्यात आला आहे
तीन मुले झाली पोरगी
प्रवीण तेलगोटे हे हालाकीच्या परिस्थितीतही त्यांची दोन मुले व एका मुलीला शिकवत होते. आता या मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र हरवल्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्यामागे दोन मुले प्रज्वल (१२), प्रेमानंद (९), मुलगी प्राची वय (१४), पत्नी, आई वडील असा आप्त परिवार आहे.
