पातुर प्रतिनिधी पातुर शिवसेना उभाठा गटाकडून माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पातुर शहरातील गोरगरीब जनतेला ब्लॅंकेट व साडीचोळी वाटप करण्यात आला. वाढदिवसानिमित्त पातुर शहरातील प्राचीन भोलेनाथाच्या मंदिरामध्ये पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभो याकरिता चिमुकली आराध्या बंड हीच्या हस्ते पदधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुग्ध अभिषेक करण्यात आला.

पातुर शहरातील झोपड्या मध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांना आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख निरंजन बंड त्यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी महिलांना साळीचोळी व ब्लँकेट वाटप करण्यात आले.

यावेळी पातुर शहरातील शिवसेनेचे शहर प्रमुख निरंजन बंड, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर, प्रदीप काळपांडे, कैलास बगाडे, आनंद तायडे, विशाल तेजवाल, अजय पाटील, कृष्णा बोटकार, विनोद बोंबटकर, विकी पाटील, रवी काकड, सुनील माऊलीकर, सचिन गिरे, तुषार शेवलकार, गणेश पाटील, विशाल सोनवणे, राम कराले, विष्णू ढगे, प्रवीण देवकर, पवन गाडेकर, रावसाहेब देशमुख, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते