श्री दत्तात्रय शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला सलगनितश्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे याच्या वतीने ग्राम तांदळी येथील शेतकऱ्यांना कृषी दूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन नवीन चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाची माहिती दिली. सुका चारा व कोंबड्यांवर प्रक्रिया कशी करावी या संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या शंका व समस्यांचे उपस्थित विद्यार्थ्यांनी निराकरण केले.सचिन बर्डे, अनिल गावंडे, दत्तात्रेय बर्डे, प्रेमशिंग सोळंके, विवेक नाकट, निखिल नाकट, सागर सागर नाकट हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविघालय शिर्ला अंधारे येथील प्राचार्य डॉ. राम खर्डे, कार्यक्रम अधिकारी प्रा. शिव कुमार राठोड, प्रा. श्रद्धा चव्हाण, कार्यक्रम समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयतील सातव्या सत्रातील विद्यार्थी गायत्री खंडारे ,आश्विनी पांडव, वैशाली राऊत ,प्रतिक्षा सावजी ,भाग्यश्री सोळंके,साक्षी सोळंके व दामिनी ठोसरे यांनी यशस्वी रित्या पार पाडले.
