- इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अकोला जिल्ह्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला एक लाख रुपये रोख पारितोषिक देणार…. माजी आमदार बळीराम सिरस्कार पातुर: येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका इंदुताई निलखण होत्या तर उद्घाटक म्हणून बाळापुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम शिरसकर यांची उपस्थिती होती आणि प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सपनाताई म्हैसने,संचालक पांडुरंग अरबाड, विलास मेतकर प्रशांत म्हैसने, ज्येष्ठ पत्रकार उमेश देशमुख,मोहन जोशी सह सामाजिक कार्यकर्ते मधुकर उगले निरंजन बोंबटकार यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात यशस्वी व्हायचं असेल तर विविध स्पर्धेत भाग घेणे महत्त्वाचे असते. रोपट्याचा वटवृक्ष झालेल्या या शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आज राज्यस्तरावर झेप घेत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी केले. तर बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची अभ्यासात सुरस लागावी यासाठी दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवनाऱ्या विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी व्यासपीठावरून केली.
सदर सांस्कृतिक कार्यक्रमात विविध राज्यांच्या वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी नृत्य व नाट्य सादर करून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा प्रयत्न केला तर क्रीडा महोत्सव दरम्यान देशी खेळांचा विसर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध देशी खेळांचे आयोजन करून आपल्या भारतीय खेळांची परंपरा टिकून राहण्यासाठी विविध खेळांचे आयोजन केले होते सदर स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाला पालकांसह हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी शालेय परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आरबाड यांचे सह शाळेच्या विद्यार्थिनींनी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापक सचिन ढोणे व प्राचार्य जयद्रथ कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
==================
अशीही एक आगळीवेगळी परंपरा
दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे केले जातात व या दिवसाला ध्वजारोहणाचा मान प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिला जातो परंतु सावित्रीबाई फुले विद्यालयात एक आगळीवेगळी परंपरा जपत इयत्ता दहावी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते 15 ऑगस्ट ला तर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याच्या हस्ते 26 जानेवारीला ध्वजारोहण केले जाते त्या दृष्टीने यावर्षी 26 जानेवारीला ध्वजारोहणाचा मान इयत्ता बारावी मध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. प्राजक्ता चव्हाण हिला मिळाला.