पातुर प्रतिनिधी
तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,पातुर आज माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२४-२५ चा निकाल लागला.त्यामध्ये विद्यालयातील २५० पैकी २३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तुळसाबाई कावल विद्यालयातील २०४ विद्यार्थी हे प्राविण्यश्रेणीमध्ये पास झालेले आहेत.तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,पातुर मधील ईशात गुलाब सावत हा विद्यालयातून प्रथम क्रमांकाने पास झालेला आहे.त्याला ९५.४०% गुण मिळालेले आहेत.विशेषतः हा एनसीसी मध्ये सर्जंट म्हणून दोन वर्ष राहिला आहे.त्याने एनसीसी चा ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प तिरुपती येथे पूर्ण सुद्धा केला.म्हणून त्याला भविष्यामध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये काम करायची इच्छा आहे.भविष्यामध्ये देशाचा कर्तव्यदक्ष ऑफिसर म्हणून कामगिरी करायची आहे. विशेषता ईशांत सावंतची आजी पासून सर्व घरातील सभासद तुळसाबाई कावल विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेले आहेत.वडील गुलाब सावत हे वॉटर सप्लाय ऑफिसमध्ये कार्यरत आहे.आई गृह कामाबरोबर ईशांतचा अभ्यास कशाप्रकारे पूर्ण होईल याकडे सदैव लक्ष देऊन राहत. विद्यालयामधून द्वितीय क्रमांक श्वेता अशोक पवार ९३.८० ही सुद्धा एनसीसी ची कॅडेट असून आर डी सी च्या प्रथम दोन कॅम करिता अमरावती येथे नेमणूक झालेली होती.ती सुद्धा दोन वर्षे एनसीसी मध्ये विद्यालयाच्या मुलीच्याग्रुप ची सर्जंट म्हणून एनसीसी मध्ये सहभागी होऊन प्रथम श्रेणीमध्ये पास झालेली आहे.तृतीय क्रमांक प्राची जगदीश इंगळे हिला ९३.४०% गुण मिळालेले आहेत.
विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर चे व्यवस्थापक श्री विजयसिंह गहिलोत सचिव स्नेह प्रभादेवी गहिलोत प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत,उपप्राचार्य एस बी चव्हाण,उपमुख्याध्यापिका आर एस ढेंगे,पर्यवेक्षिका पी एम कारस्कर,पर्यवेक्षक एस आर मुखाडे,प्रथम तिनीही विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षिका एस पी नागरे व सायन्स शिक्षिका एस ए अयाचित,जी एम निमकंडे,एनसीसी ऑफिसर एस एस इंगळे हे सुद्धा उपस्थित होते.