स्थानिक तुळसाबाई कावल उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यानी नुकतीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पातुर शाखेला विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी बँकेची कार्यप्रणाली त्यांनी जाणून घेतली . बँकेत विविध व्यवहार कसे केले जातात याविषयी त्यांना बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले. शाखा व्यवस्थापक श्री शशी भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी समजावून सांगण्यात आल्या. तसेच बँकेचे व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी , डिजिटल व्यवहार कसे करावे , बँकेच्या विविध योजना , आणि प्रत्येक टेबलवर कोणते काम केले जाते याविषयी देखील सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी उत्तरे दिली.
सदर उपक्रम वर्ग १२ वी च्या सहकार विषयाच्या अभ्यासक्रमात असलेल्या “जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ” या प्रकरणाच्या अनुषंगाने राबविण्यात आला. यावेळी इयत्ता अकरावी व बारावीचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक अंशुमानसिंह गहिलोत सर , उपप्राचार्य एस. बी. चव्हाण सर ,उपमुख्याध्यापिका रश्मी ढेंगे मॅडम , पर्यवेक्षिका प्रीती कारस्कर मॅडम तसेच शाखाव्यवस्थापक शशीभाऊ थोरात व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी यांच्या सहकार्याने क्षेत्रभेट हा उपक्रम यशस्वी पार पडला.