जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे पातुर पोलीस स्टेशन च्या वतीने भव्य स्वागत
पातूर प्रतिनिधी…
पातुर पोलीस स्टेशनला वार्षिक निरीक्षण भेट देऊन पोलीस दलातील मुख्य बंदूक साठा,तसेच पोलीस युनिफॉर्म निरीक्षण,पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित गुन्हे,हेड मोहरर,कॅश मोहरर, स्टेशन डायरी, क्राईम ची तपासणी व पोलिसांवर कामाचा वाढता ताण,तणाव यांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांनी पोलीस कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी बाळापुर उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज व पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात पातुर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांना मानवंदना देऊन स्वागत केले.

पातुर पोलीस स्टेशन हे फुलांनी व रांगोळीच्या सजावटीने विविध रंगात सजवण्यात आले होते. तर पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिडीतांना न्याय देण्यात यावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या व पोलिस कर्मचारी यांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता दरबार सभा मंडपाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रसंगीक सभेदरम्यान पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पोलीस कर्मचारी याचे बोलतांना कौतुक केले व पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक विभागातील निरीक्षण केले व पोलीस कवायत करण्यात आली रायफल कवायत रइवईजन घेण्यात आले.

तसेच पातुर पोलीस स्टेशन मंध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस क्वार्टर ची पाहणी केली व उर्वरित पोलीस कॉटर बांधकाम करण्या करिता पाठपुरावा करून लवकरच पोलीस विभागा करीता सोईचे करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिले या वेळी बाळापूर उपविभागीय अधिकारी गोकुळ राज यांच्या सह पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके , उपनिरीक्षक गजानन पोटे, उपनिरीक्षक सोळंके , उपनिरीक्षक नवघरे, व पोलीस कर्मचारी महिला पोलिस,
वाहतूक पोलीस कर्मचारी, होमगार्ड सैनिक यांच्या सह पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱे पोलीस पाटील,यांची उपस्थिती होती.