पातुर प्रतिनिधी:-टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या वतीने 24 ते 26 एप्रिल 2025,दरम्यान नागपूर येथे 20 वी ज्युनियर 17 वर्षाखालील मुलं मुलीं आणि 8 वी मिनी सब ज्युनियर 14 वर्षाखालील मुला मुली चे महाराष्ट्र राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या करीता टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अकोला जिल्ह्याच्या माध्यमातून अकोला जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा पातुर येथील तुळसाबाई कावल विद्यालयच्या क्रीडांगणात संपन्न होऊन अकोला जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे.यामध्ये मुलांच्या 14 वर्षाखालील संघात शैलेश जाधव,अर्जुन वानखडे,प्रफुल पातुरे,अमित तायडे,समर्थ जाधव,श्रेयश नितीन उजाडे,भार्गव मंगेश पांडे,पार्थ विनोद वाकोडे,क्षितिज उमेश दुर्गे.तसेच 17 वर्षाखालील संघामध्ये अक्षय खोडे,आर्यन पवार,गजाननअत्तरकार,महेश भोकरे,अमनचौहान,विवेक खंडारे,अनुज श्रीनाथ,शिवम यादव,पवन म्हैसने,प्रणव गवई.वरील सर्व विजयी निवड झालेल्या खेळाडूंचे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अकोला जिल्ह्याचे सचिव शिवाजीराव चव्हाण व पातुर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अर्जुनसिंह गहिलोत
यांनी अभिनंदन केले आहे.
