पातुर येथून गो वंशाची चोरी करून मुद्देमालासह टोळी आपल्याकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळताच त्यांनी ६ डिसेंबर रोजी सापळा रचून हुसेनी शॉप च्या पाठीमागे एका पांढऱ्या रंगाच्या टाटा विस्टा कार MH २० DF 0311 या वाहनामध्ये पातुर परिसरातून चोरून आणलेला मुद्देमाल रंगेहात पकडला यामध्ये एक पांढऱ्या रंगाची टाटा विस्टा कार ज्यामध्ये गोवंश जातीची एक गाय एक कालवड असे निर्दयीपणे जनावर कोंबून बाहेर काढतांना आरोपी शेख सोयल शेख एसुफ वय 28 वर्ष राहणार भरत नगर अकोट फाईल अकोला, एजाज शाह युनूस शाह राहणार भगतवाडी अकोला यांना ताब्यात घेऊन सदर प्रकरणाची चौकशी केली असता आरोपीने पातुर परिसरामध्ये चोरी केल्याचे कबुली दिली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने पातुर पोलीस स्टेशन यांच्या आरोपी व मुद्देमाल ताब्यात दिला. पातुर पोस्टे यांनी अपराध नंबर 540/ 23 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास भगत, गोपाल जाधव, दशरथ बोरकर, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, मोहम्मद अमीर अन्सार शेख, लीलाधर खंडारे, अभिषेक पाठक, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल अक्षय बोबडे यांनी केली आहे
