श्री दत्तात्रय शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित व डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला सलगनित
श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे याच्या वतीने ग्राम वाडेगाव येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत माती परिक्षण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे दरम्यान. शेतकऱ्यांना माती परिक्षणाची महत्व, माती परीक्षण का ?करावे त्याचे फायदे, माती परीक्षण कशी करावे याबद्दल विद्यार्थ्यांनी महत्व पटवून दिले. त्यादरम्यान प्रगतशील शेतकरी माणिकराव राऊंडकर, मंगेश राहुडकर, पुंडलिक नागे , प्रफुल फाडके, जगन्नाथ मानकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविघालय शिर्ला अंधारे येथील प्राचार्य डॉ राम खरडे व प्रा शैलेश दवणे प्रा. सागर भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयतील सातव्या सत्रातील विद्यार्थी निपुल गावंडे, प्रणोती गेडाम, आदित्य घुणारे, प्रतिक ग्रामकर , अभिषेक हरकंडे यांनी यशस्वी आयोजित केला.
