प्रतिनिधी संगीता इंगळे —पातुर तालुक्यातील चानी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दिग्रस बु येथे महिलेची हत्या करण्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती अशी आहे की आज दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान दिग्रस येथे राहत असलेली महिला सुनंदा कैलास गवई वय 50 वर्ष या महिलेची घरगुती वादातून जेठाने चाकूने भोसकून हत्या केली ची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच चाणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण उपनिरीक्षक गणेश महाजन हे आपल्या कर्मचाऱ्यासह पोहचून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला व एक आरोपी तब्येत घेतला असून मृतक महिलेस अकोला येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी गोकुळराज यांनी भेट दिली घटनास्थळी बीट जमदार शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर करवते यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित असून पुढील तपास चानी पोलीस करीत आहेत