पातुर प्रतिनिधी :-तुळसाबाई कावल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील एनसीसी च्या दोन जेडब्ल्यू कॅडेट ची निवड ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प तामिळनाडू करिता निवड झाली,आणि तो यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केला.
सिंदूर ऑपरेशन” हे यशस्वी झाले.या ऑपरेशनमध्ये दोन भारतीय महिला अधिकारी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी नेतृत्व केले.त्यांनी या ऑपरेशनच्या यशस्वितेबद्दल पत्रकार परिषद घेतली.हा एक अतिशय प्रभावित करणारा अनुभव होता आणि त्यामुळेच प्रभावित होऊन तुळसाबाई कावल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या गर्ल्स एनसीसी कॅडेट ची निवड ही ऑल इंडिया ट्रेकिंग एक्सपिडिशन,निलगिरी, तामिळनाडू येथे झाली. तुळसाबाई कावल विद्यालयाची प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत,इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला चेक कर्नल विजय नारायण शुक्ला बी एस एम व ॲडम ऑफिसर लेफ्टनंट करणे सुनील कुमार यांच्या माध्यमातून शाळेच्या दोन कॅडेट ची निवड झाली. कोइंबतूर एनसीसी ग्रुप व तामिळनाडू,पांडिचेरी आणि आंध्र प्रदेश डायरेक्टरेट यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १३ मे २०२५ ते २० मे २०२५ पर्यंत हा ट्रेकिंग कॅम्प आयोजित करण्यात आला. त्यामध्ये तुळसाबाई कावल विद्यालयाच्या दोन जेडब्ल्यू एनसीसी कॅडेट ची नियुक्ती झाली.त्यामध्ये ग्रुपची सर्जंट पूनम दिलीप अवचार व ऋतुजा रामेश्वर अमानकर ह्या दोन गर्ल एनसीसी कॅडेट ची निवड झाली.पुनम अवचार चे वडील हे स्वतः आर्मी मध्ये नोकरी केलेली आहे.पुनम व ऋतुजा यांनी ट्रेकिंग यशस्वीरित्या पूर्ण केला. कॅम्पच्या दरम्यान ट्रेकिंग कशा प्रकारे करतात याबद्दल सविस्तर माहिती घेतली.कॅम्प दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कशाप्रकारे आहे याविषयी माहिती दिली.संपूर्ण भारतामधून यामध्ये मोजक्याच गर्ल एनसीसी कॅडेट ची निवड होत असते त्यामुळे प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक बद्दल माहिती मिळते,विचारांची देवाण-घेवाण वाढते, विविधतेमध्ये एकता कशाप्रकारे आहे याचे सुद्धा अनुभव येतात,एकात्मतेची भावना वाढते.मिळून मिसळून कसे राहावे याची सुद्धा माहिती मिळते.अशा प्रकारचा हा ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प पूर्ण करून ह्या एनसीसी कॅडेट परत आलेले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापक विजय सिंह गहीलोत,सचिव सौ.स्नेह प्रभादेवी गहीलोत,प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण,उपमुख्याध्यापिका आर एस ढेंगे,पर्यवेक्षिका पी एम कारस्कर,पर्यवेक्षक एस आर मुखाडे,एनसीसी ऑफिसर सुभाष इंगळे यांनी कौतुक केले.
