अकोला – यशवंत भवन येथे श्रद्धेय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे सर्व युवक या मध्ये स्वप्निल तवर पाटील माजी सरपंच नदीम अली कृषिद अली माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर तवर पाटील अविनाश बर्डे पाटील सुभाष ठाकरे पाटील रोशन राऊत पाटील आकाश ठाकरे पाटील शिवा श्रीनाथ अंकित तवर पाटील अनिकेत तवर शुभम तवर अमोल कोरडे संतोष वावटेकर पंजाबराव तवर अमोल तवर चेतन राऊत मदन ठाकरे यांचा सह अनेक युवकांनी वंचित चे नेते कश्यपभाऊ जगताप व संजयभाऊ नाईक यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी देंडवे महासचिव मिलिंदजी इंगळे महिलाजिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाठ युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांतभाऊ घोगरे महासचिव राजकुमारभाऊ दामोदर तालुका अध्यक्ष सुनीलभाऊ सरदार शिक्षण सभापती मायाताई नाईक यांच्या मार्गदर्शनात व वंचित चे सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांचा पुढाकाराने वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला .प्रवेश घेतलेल्या सर्व युवकांनी आम्ही एक निष्ठेने व तन मन धनाने वंचित बहुजन आघाडी चे काम करू असे वचन दिले या वेळी जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वरभाऊ सुलताने जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ गव्हाणकर ,प्रा. डॉ. प्रसन्नजीतभाऊ गवई, सना भाई, यशपाल जाधव, सतीश वानखडे , संकेत शिरसाट, विलास जगताप,आकाश गवई ,रवी पाटील,गजानन सुरवाडे,राजेश मुधावने अविनाश वानखडे पाटील अरुण बलखंडे आदी सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
